Posts

Showing posts from April, 2020

Manache Shlok, Manache Shlok With Meaning, Spirituality, Adhyatm Ani Apan (मनाचे श्लोक व अर्थ )

Image
Manache Shlok, Manache Shlok With Meaning, Spirituality, Adhyatm Ani Apan (मनाचे श्लोक व अर्थ ) ||श्री || ॥ श्री रामाची आरती ॥ त्रिभुवनमंडितमाळ गळां। आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥ ठकाराचे ठाण वारीं धनुष्यबाण। मारुती सन्मुख उभा कर जोडून॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥ भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती। स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥ रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी। आरती ओवाळूं चौदां भुवनांच्या कोटी॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥ विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें। आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा|| Manache Shlok, Manache Shlok With Meaning, Spirituality, Adhyatm Ani Apan (मनाचे श्लोक व अर्थ ) ||महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्वगूणे जयाते स्मरे शैलजा शूलपाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || अर्थ समर्थ रामदासस्वामी...

Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )27, 28, 29

Image
Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )27, 28, 29 ||श्री || मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगूळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपाची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, काखेस झोळी, अशा थाटात समर्थांची रुबाबदार आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी मूर्ती संचार करीत असे. “शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरी ज्ञान योगेश्र्वराचे। कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।” हा श्लोक वामन पंडितांनी समर्थ रामदासांना उद्देशून लिहिला आहे. Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )27, 28, 29 ||दिनानाथ हा राम कोदंडधारी पुढे देखता काळ पोटी थरारी मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || अर्थ समर्थ रामदास स्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये त्या परमात्म्याच्या शक्तीचे वर्णन करतात. समर्थ रामदासांचे गुरु हे प्रभू श्रीरामचंद्राच आहेत, ते त्यांचीच भक्ती करीत होते, त्यांचं नाम सदैव समर्थांच्या मुखामध्ये होते. समर्थ आपल्या श्लोकामध्ये त्याच श्रीरामांचे वर्...

Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )24, 25, 26

Image
Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )24, 25, 26 ||श्री || रामदासस्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. त्यांच्या तत्त्वज्ञानास संत एकनाथांच्या वाङ्‌मयाची बैठक होती. दासबोधाच्या बहुतेक सर्व दशकांमध्ये ब्रह्म, माया, जीव, जगत्‌, परमेश्वर इत्यादी गोष्टींची चर्चा आहे. पंचीकरण हा विषय समर्थांनी अतिशय सखोलपणे सांगितला आहे. परब्रह्म, मूळमाया, गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड-ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध अशा अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात आहे. सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून, आपण मिथ्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्तेपण घेतो असे ते सांगतात. समर्थ रामदास स्वामी स्वतः सदैव विदेही अवस्थेमध्ये असल्याने त्यांचे हे अनुभवज्ञान त्यांनी ग्रंथरूपाने मांडले. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असे त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. त्यांनी स्वतः १२ वर्षे नामस्मरण भक्ती केली व त्याचा प्रसार केला. परमार्थाशिवाय केल...

Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )21, 22, 23

Image
Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )21, 22, 23 ||श्री || केल्याने होत आहे रे । आज आपल्या जीवनात अपयश आणि दु:ख दिसत असेल, तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख, आंनद, यश, कीर्ती, ऐश्वर्य, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत. परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे. आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी बारा वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत. या सतत केलेल्या प्रयत्नांनाच ‘तप’ असे म्हटले जाते. आपला प्राचीन इतिहास वाचला म्हणजे खर्‍या धैर्याची कल्पना येऊ शकेल. जगातील सर्व देशात आणि सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही. म्हणूनच परिस्थितीवर मात करुन ते यशस्वी झाले. अंत:करणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत, अशी ज्याची दृढ ...

Manache Shlok With Meaning (मनाचे श्लोक व अर्थ )18, 19, 20

Image
Manache Shlok With Meaning (मनाचे श्लोक व अर्थ )18, 19, 20 ||श्री || रामदासस्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. त्यांच्या तत्त्वज्ञानास संत एकनाथांच्या वाङ्‌मयाची बैठक होती. दासबोधाच्या बहुतेक सर्व दशकांमध्ये ब्रह्म, माया, जीव, जगत्‌, परमेश्वर इत्यादी गोष्टींची चर्चा आहे. पंचीकरण हा विषय समर्थांनी अतिशय सखोलपणे सांगितला आहे. परब्रह्म, मूळमाया, गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड-ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध अशा अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात आहे. सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून, आपण मिथ्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्तेपण घेतो असे ते सांगतात. समर्थ रामदास स्वामी स्वतः सदैव विदेही अवस्थेमध्ये असल्याने त्यांचे हे अनुभवज्ञान त्यांनी ग्रंथरूपाने मांडले. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असे त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. त्यांनी स्वतः १२ वर्षे नामस्मरण भक्ती केली व त्याचा प्रसार केला. परमार्थाशिवाय के...

Manache Shlok With meaning(मनाचे श्लोक व अर्थ ) 16, 17

Image
Manache Shlok With meaning(मनाचे श्लोक व अर्थ ) 16, 17 ||श्री || छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास यांचे शिष्य होते. स्वराज्य रक्षणासाठी रामदासांनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १५ सप्टेंबर १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिली होती. याबाबतचे एक पत्र इ. स. १९०६ मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवांनी ‘समर्थांची दोन जुनी चरित्रे’ या ग्रंथात प्रकाशित केले होते; पण या वेळेस देवांना या पत्राची मूळ प्रत न मिळता एक नक्कल सापडली होती. यानंतर इतिहासाचार्य राजवाड्यांनाही या पत्राच्या काही नकला सापडल्या. शिवाय, अनेक नकला पुणे पुराभिलेखागारात इनाम कमिशनच्या दफ्तरातही सापडतात; पण या सगळ्या नकला अथवा मूळ पत्राच्या कॉपी असून मूळ पत्र हे अनेक वर्षे कोणाच्याही पाहण्यास आले नव्हते. अखेरीस मे २०१७ मध्ये लंडनच्या ‘ब्रिटिश लायब्ररी’त या मूळ पत्राची फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनवलेली एक प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना सापडली असून, महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे आहेत, त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत...

Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ, adhyatm ani apan, spirituality) 14, 15

Image
Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ, adhyatm ani apan, spirituality) ||श्री || वयाच्या ३६व्या वर्षी रामदासस्वामी महाराष्ट्रात परत आले. भारत प्रवास करतांना शेवटी समर्थ पैठणला आले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यातच उतरले. नाथ आणि त्यांची पत्‍नी या दोघांनी देह ठेवलेला होता. नाथांची पत्‍नी समर्थांची मावशी होती. पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले. मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्नमंडपातून पलायन केल्यावर २४ वर्षे जांबशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता. त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तेथे कळले.त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे, असे येऊन गेले. समर्थ जांबला पोहोचले, पण तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि शाम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्याया गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. २४ वर्षात दाढी, जटा वाढविल्याने आणि व्यायामाद्वारे शरी...

Manache Shlok, Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ, Spirituality, Adhyatm Ani Apan) 12, 13

Image
Manache Shlok, Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ, Spirituality, Adhyatm Ani Apan) ||श्री || समर्थांनी ११ मारुतींची स्थापना केली. गावोगाव मारुतीची देवळे बांधली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची देवळे याच परिसरात आहेत. ती पुढीलप्रमाणे: (१) दास मारुती, चाफळ (राम मंदिरासमोर) (२) वीर मारुती, चाफळ (राम मंदिरामागे) (३) खडीचा मारुती, शिंगणवाडी, चाफळ (डोंगरावर) (४) प्रताप मारुती, माजगांव, चाफळ (५) उंब्रज मारुती (ता. कराड) (६) शहापूर मारुती (उंब्रज जवळ) (७) मसूर मारुती (ता. कराड) (८)बहे-बोरगांव (कृष्णामाई) मारुती (जि. सांगली) (९) शिराळा मारुती (बत्तीस शिराळा, जि. सांगली) (१०) मनपाडळे मारुती (जि. कोल्हापूर) (११) पारगांव मारुती (जि.कोल्हापूर).[४] ही ती गावे होत Manache Shlok, Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ, Spirituality, Adhyatm Ani Apan) ||मना मानसी दुख आ...

Manache Shlok, Manache Shlok With Meaning, Spirituality(मनाचे श्लोक व अर्थ, adhyatm ani apan) 10, 11

Image
Manache Shlok With Meaning, Spirituality(मनाचे श्लोक व अर्थ, adhyatm ani apan) ||श्री || समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला. ‘ श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. हरगोविंदसिंगांबरोबर १००० सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले - " आपण धर्मगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता ?" तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले - " एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी". समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले - "आणि हा सारा फौजफाटा ?" त्य...

Manache Shlok, Manache Shlok With Meaning (मनाचे श्लोक आणि अर्थ, adhyatm ani apan, spirituality) 8, 9

Image
Manache Shlok, Manache Shlok With Meaning (मनाचे श्लोक आणि अर्थ, adhyatm ani apan, spirituality) ||श्री || समर्थ दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच 'करुणाष्टके' होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला.त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता. Manache Shlok, Manache Shlok With Meaning (मन...

Manache Shlok, Manache Shlok With Meaning, मनाचे श्लोक व अर्थ (Spirituality, Adhyatm Ani Apan, Adhyatm) 6, 7

Image
Manache Shlok, Manache Shlok With Meaning, मनाचे श्लोक व अर्थ (Spirituality, Adhyatm Ani Apan, Adhyatm) ||श्री|| वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला असे मानले जाते. नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत.रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले. Manache Shlok, ...

मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan) 4, 5

Image
मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan) समर्थ रामदासस्वामी(नारायण) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांब या गावी (जालना जिल्हा) शके १५३० मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकर होता. . लहानपणी नारायण साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan) ||श्री || "मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना सर्वथा नीति सोडूं नको हो। मना अंतरीं स...