Manache Shlok, Manache Shlok With Meaning, Spirituality, Adhyatm Ani Apan (मनाचे श्लोक व अर्थ )
Manache Shlok, Manache Shlok With Meaning, Spirituality, Adhyatm Ani Apan (मनाचे श्लोक व अर्थ )
||श्री ||॥ श्री रामाची आरती ॥
त्रिभुवनमंडितमाळ गळां।
आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा॥
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥
ठकाराचे ठाण वारीं धनुष्यबाण।
मारुती सन्मुख उभा कर जोडून॥
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥
भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती।
स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती॥
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥
रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी।
आरती ओवाळूं चौदां भुवनांच्या कोटी॥
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥
विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें।
आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें॥
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा||
Manache Shlok, Manache Shlok With Meaning, Spirituality, Adhyatm Ani Apan (मनाचे श्लोक व अर्थ )
||महासंकटी सोडिले देव जेणे
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||
अर्थसमर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये सांगत आहेत कि,
असा तो परमेश्वर ज्याने देवांनासुद्धा संकटातून सोडवले होते, ज्या परमेश्वराने ही पृथ्वी पाण्यामध्ये बुडताना वाचवली, ज्या परमेश्वराने वेळोवेळी देवदेवतांसाठी अवतार घेतले, ज्याचा शक्तीचे आपण वर्णन करू शकत नाही अशा श्रीरामांचे जे प्रत्यक्ष श्री विष्णूंचे अवतार आहेत त्यांचे स्मरण स्वतः महादेव करतात, अशा प्रभू श्रीरामांची तू भक्ती कर असे समर्थ रामदासस्वामी आपल्या मनाला समजावून सांगतात.
परमेश्वरावर श्रद्धा ठेवणे खूप अवघड असते त्याहुनी अवघड परमेश्वरावर दृढ विश्वास बसने असते. समर्थ आपल्या मनाला सांगतात कि प्रभू श्री राम आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करत नाहीत, भक्तांना कधीच संकटात एकटे सोडत नाहीत, म्हणून हे मना त्या प्रभूची तू निःस्वार्थ पणे भक्ती कर.तरच मुक्तीचा मार्ग मोकळा होईल.
Manache Shlok, Manache Shlok With Meaning, Spirituality, Adhyatm Ani Apan (मनाचे श्लोक व अर्थ )
||अहल्या शिळा राघवे मुक्त केली
पदी लागता दिव्य होऊनि गेली
जया वर्णिता शीणली वेदवाणी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी||
अर्थसमर्थ रामदास्वामी आपल्या या श्लोकामध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या कार्याचे वर्णन करतात.
यामध्ये एक अहिल्ये ची कथा वर्णन केली आहे.
अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी होती, खूप सुंदर आणि तेजस्वी रूप असलेली स्त्री होती, देवराज इंद्र तिची ख्याती ऐकून कामवासनेत बुडालेला होता. एकदा गौतम ऋषीं तपश्चर्या करण्यासाठी बाहेर गेले, अहिल्यादेवी पर्णकुटीमध्ये एकटीच होती. त्यावेळी कामवासनेत बुडालेल्या इंद्राने तिचा उपभोग घेण्याचे ठरविले आणि तो गौतम ऋषींचे रूप घेऊन पर्णकुटीमध्ये गेला आणि समागम करून परत निघाला त्याचवेळी गौतम ऋषी माघारी येत होते त्यांनी मायावी इंद्राला आपल्या वेशात पहिले आणि घडलेल्या घटनेची सर्व जाणीव त्यांना झाली, गौतम ऋषी भडकले आणि त्यांनी अहिल्येला शाप दिला कि तू शिळा होऊन राहशील.
अहिल्येने गौतम ऋषींना विनवणी केली कि हे पतीदेव मी त्या मायारूपी इंद्राला ओळखू शकले नाही मला माफ करा, तुमचं रूप पाहून मी स्वीकृती दिली, मला उशाप द्या. त्यावेळी गौतम ऋषी म्हणाले ज्यावेळी सत्युगात प्रभू श्रीराम या वनातून जातील तेंव्हा त्यांच्या चरणधुळीच्या स्पर्शाने तुझा उद्धार होईल.
असा प्रभू श्री रामाचा अहिल्येच्या उद्धाराचा कार्यभाग होता. असे प्रभू श्री राम ज्यांचे वर्णन करताना प्रत्यक्ष वेद प्रकट होतात अशा प्रभू श्रीरामांची भक्ती करू. जे नेहमी आपल्या भक्तांची उपेक्षा न करता त्यांचा अभिमान बाळगत असतात.
Manache Shlok, Manache Shlok With Meaning, Spirituality, Adhyatm Ani Apan (मनाचे श्लोक व अर्थ )
||वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला
शशी सूर्य तारांगणे मेघमाळा
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||
अर्थ
समर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये सांगतात कि,
मेरू पर्वत आणि मंदार पर्वत ज्यांचा वापर करून समुद्रमंथन झाले अशा पर्वतांची रचना त्या माझ्या प्रभू श्री रामाने केली, त्यांचा वास त्याच्यात आहे इतकेच नव्हे तर सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, आकाशगंगा, ही संपूर्ण सृष्टी, या ब्रम्हन्डाची निर्मिती माझ्या या प्रभू परमेश्वर श्री रामांनीच केली आहे.
माझा प्रभू श्री रामाचें प्रिय भक्त श्री मारुती ज्यांना अमरत्वाचे वरदान मिळाले, ज्यांनी अखंड प्रभू श्री रामांची भक्ती केली, चरणसेवा केली. आणि दुसरे बिभीषण रावणाचे सख्खे बंधू जे प्रभू श्री रामांचे भक्त झाले या दोघांचाही प्रभूंनी उद्धार केला.
असे माझे प्रभू श्रीराम भक्ताचा अभिमान बाळगणारे आहेत, ते नेहमी त्यांच्या भक्तांवर कृपा करतात.
Manache Shlok, Manache Shlok With Meaning, Spirituality, Adhyatm Ani Apan (मनाचे श्लोक व अर्थ )
|| जय जय रघुवीर समर्थ ||
Manache Shlok, Manache Shlok With Meaning, Spirituality, Adhyatm Ani Apan (मनाचे श्लोक व अर्थ )
Comments
Post a Comment