Manache Shlok, Manache Shlok With Meaning (मनाचे श्लोक आणि अर्थ, adhyatm ani apan, spirituality) 8, 9
Manache Shlok, Manache Shlok With Meaning (मनाचे श्लोक आणि अर्थ, adhyatm ani apan, spirituality)
||श्री ||समर्थ दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच 'करुणाष्टके' होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला.त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता.
Manache Shlok, Manache Shlok With Meaning (मनाचे श्लोक आणि अर्थ, adhyatm ani apan, spirituality)
||देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी
मना सज्जना हेची क्रिया धरावी
मना चंदनाचे परी तवा झिजावे
परी अंतरी सज्जना नीववावे||
अर्थसमर्थ रामदास आपल्या मनाच्या श्लोका मध्ये आपल्या मनाला जीवनाचा अर्थ समजावून सांगतात.या जीवनामध्ये, संसारामध्ये जेवढं काही दिसत आहे ते सर्व नश्वर आहे, मिथ्य आहे, कधी ना कधी ते नष्ट होणार आहे, गाडी, बंगला, पैसा इतकचं काय तर शरीर सुद्धा ही सर्व काही मोह माया आहे. जे दिसत नाही परंतु सर्व गोष्टींमध्ये सामावलेला आहे तो म्हणजे परमेश्वर तोच एक सत्य आहे. जो तिन्ही गुणांचा स्वामी असून निर्गुण निराकार आहे. जिवन हा एक पाण्याचा बुडबुडा आहे, कधीही नष्ट होऊ शकतो असा. जन्म आणि मृत्यू यामधील अंतर म्हणजे जिवन आहे. आणि हे अंतर उत्तम कर्माने पार पडले तरच मोक्ष प्राप्ती होते, वाईट कर्माने पुन्हा जन्म व मृत्यूच्या फेऱ्यात अडकून हे अंतर पार पडावे लागते. मृत्यूनंतर देह नष्ट होतो, उरते ते फक्त नाव आणि ते नाव त्या त्या देहाच्या कर्मानुसार टिकले जाते.
म्हणून समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात कि अशी कर्म करावीत कि मृत्यूनंतर सुद्धा कीर्ती राहील. जसं चंदन स्वतः झिजून इतरांना आपला सुगंध देतो अगदी त्याच प्रमाणे आपण उत्तम कर्माने आपला देह झिजवून समाजाचे, आपल्या राज्याचे, आपल्या देशाचे ऋण फेडायला हवे.
Manache Shlok, Manache Shlok With Meaning (मनाचे श्लोक आणि अर्थ, adhyatm ani apan, spirituality)
||नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे
अ- ति स्वार्थ बुद्धी नारे पाप सांचे
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे
न होता मना सारिखे दुख: मोठे||
अर्थसमर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या मनाला मत्सर, स्वार्थ, अपेक्षा या विकारांची माहिती देत आहेत. समर्थ म्हणतात की दुसऱ्याच्या सुखावरती, पैशावरती, वैभवावरती डोळा ठेऊ नये. परमेश्वराने आपल्याला जे दिल आहे त्याकडे पाहावे आणि त्यातच समाधानी राहावे तेच आपल्यासाठी उत्तम आहे. कारण जे आपल्यासाठी योग्य आहे तेच आपल्यासाठी परमेश्वराने दिलेले असते तेच उत्तमरीत्या सांभाळणे हेच आपले कर्तव्य आहे. "ठेविले अनंते तैसेचि राहावे |चित्ती असुद्यावे समाधान ||"
म्हणून दुसऱ्याच्या धनावर लक्ष न देता जास्त मत्सर न करता समाधानी राहावे. अतिस्वार्थ पापामध्ये भर घालतो. जास्तीची अपेक्षा दुःख्खाच कारण ठरते.
||जय जय रघुवीर समर्थ ||
Comments
Post a Comment