मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan) 4, 5
मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan)
मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan)
||श्री ||
"मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥"
मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan)
अर्थसमर्थ रामदास स्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या मनाला सार काय नि असार काय म्हणजेच चांगल आणि वाईट याची समज देत आहेत. वासना हा सर्व विषयांमध्ये सर्वात वाईट विषय असून तेच पापकर्माचे मूळ आहे. वासना म्हणजेच आसक्ती, ओढ.वासने मधून आसक्ती जन्माला येते, आसक्तीमधून लोभ आणि स्वार्थ यासारखे विषय जन्माला येतात, त्यामुळे मती भ्रष्ट होते त्यातून क्रोधाची उत्पत्ती होते आणि परिणामी पाप कर्मात भर पडते.
म्हंणून समर्थ आपल्या मनाला दुष्ट वासनेपासून दूर राहून भक्तिमार्गाची आसक्ती धरायला सांगत आहेत. आपल्या मनाला समर्थ सार आणि असार यातला फरक समजावून सांगतात कि संसार, प्रपंच मध्ये हे जे विषय आहेत (काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार, संशय, चिंता ) यांचा योग्य प्रमाणात, उत्तम भावार्थाने सदुपयोग केला तर ती साराची बाजू होते आणि जर अतिप्रमाणात पापबुद्धीने दुरुपयोग केला तर ती आसाराची बाजू होते. म्हणून समर्थ असार सोडून सार घ्यायला मनाला सांगत आहेत.
मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan)
"मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥"
मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan)
अर्थसमर्थ आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या मनाला समजावत आहेत कि पाप कर्म करण्याचे विचार धरू नको, विषय वासना खूप वाईट असते त्याचे अतिप्रमाणं पाप कर्माला कारणीभूत ठरते आणि नरकाचे दरवाजे खुले होतात.म्हणून नेहमी सदाचारी विचार आणि भावना मनामध्ये ठेवावी आणि उत्तम कर्माचा संकल्प करावा. मनामध्ये विषय विकारांची कल्पना धरून वाईट कर्म केल्यास समाजामध्ये आपली थू थू होते. म्हणून समर्थानी उत्तम कर्माचा संकल्प करावयास सांगितला आहे.
||जय जय रघुवीर समर्थ ||
Comments
Post a Comment