Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )27, 28, 29
Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )27, 28, 29
||श्री ||
मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगूळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपाची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, काखेस झोळी, अशा थाटात समर्थांची रुबाबदार आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी मूर्ती संचार करीत असे. “शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरी ज्ञान योगेश्र्वराचे। कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।” हा श्लोक वामन पंडितांनी समर्थ रामदासांना उद्देशून लिहिला आहे.
Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )27, 28, 29
||दिनानाथ हा राम कोदंडधारी
पुढे देखता काळ पोटी थरारी
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||
अर्थसमर्थ रामदास स्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये त्या परमात्म्याच्या शक्तीचे वर्णन करतात.
समर्थ रामदासांचे गुरु हे प्रभू श्रीरामचंद्राच आहेत, ते त्यांचीच भक्ती करीत होते, त्यांचं नाम सदैव समर्थांच्या मुखामध्ये होते.
समर्थ आपल्या श्लोकामध्ये त्याच श्रीरामांचे वर्णन करताना म्हणतात कि माझा प्रभू श्रीराम बलशाली, प्रखर तेजाने भरलेला, त्यांचे दंड हे धनुष्याने सुशोभित आहेत. त्यांचे हे रूप पाहून प्रत्यक्ष काळ, मृत्यू सुद्धा थर थर कापतो, त्यांच्या ज्ञानाच्या तेजाने अज्ञानाचा अहंकार नष्ट होतो, त्यांच्याकडच्या विवेकामुळे विषय विकार सुद्धा पळून जातात.
म्हणून समर्थ आपल्या मनाला या श्लोकामधून हे समजावून सांगत आहेत कि हे मना तू त्या राघवाची भक्ती करून त्यांचा दासानुदास बनून राहा, कारण प्रभू आपल्या भक्तावर नेहमी कृपा करतात ते प्रेमळ आहेत ते कधीच आपल्या भक्ताला एकटे सोडत नाहीत, हे सत्य विधान शाश्वत आहे. परमेश्वराला आपल्या भक्ताची ओढ असते, परमेश्वराचा आपल्या भक्तावर विश्वास असतो, म्हणून हे मना तो विश्वास मिळ्वण्याइतकी निष्ठेने तू भक्ती कर.
Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )27, 28, 29
||पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे
बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे
पुरी वाहिली सर्व जेणें विमानी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||
अर्थसमर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या गुरुची स्तुती करतात.
समर्थ म्हणतात कि माझे प्रभू रामचंद्रांची पाऊले इतकी दिव्य आणि उत्तम आहेत कि त्यांच्या चरणांनी संपूर्ण भूमी उत्तमाची होते, नवस सायास पूर्ण होतात,शापितांचा उद्धार होतो, चरणस्पर्शाने सर्व पापांचा नाश होऊन मोक्षाची प्राप्ती होते.
समर्थ म्हणतात कि रामचंद्रांच्या दासांना घाबरण्याची कसलीही गरज नाही कारण भक्तांच्या शत्रूंवरती प्रभूचे धनुष्य खूप भारी आहे.
समर्थ म्हणतात कि हे मना तू स्थिर राहा, चंचल होऊन या विषय विकारांच्या मागे धावून संसारमायेत अडकू नकोस हा कलीचा फास आहे त्याला तू घाबरू नकोस आपल्या प्रभूच्या विवेकरूपी धनुष्याचा वापर करून प्रभूचे चरण धरून या कलीसारख्या विषयविकारांच्या शत्रूवर आपले भक्ती आणि मंगलाचारणाचे बाण सोडून त्यांचा अंत कर.आपला परमेश्वर आपल हे जीवनाचं विमान मोक्षाला नेणार आहे. असे समर्थ आपल्या मनाला समजावून सांगत आहेत.
Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )27, 28, 29
||समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||
अर्थसमर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या या मनाला समजावून सांगतात कि हे मना जो परमेश्वराची मनापासून सेवा करतो भक्ती करतो, जो भक्त सर्वगुणसंपन्न आहे, अशा भक्ताकडे वाईट दृष्टी ठेवणारा या त्रैलोक्यात कोणी नाही, प्रत्यक्ष कली आणि काळ सुद्धा अशा भक्ताला भिऊन असतात. म्हणून हे मना माझ्या बाळा त्या प्रभूची भक्ती कर तो दिनाचा दयाळू आणि मनाचा मवाळू आहे त्याची ख्याती तिन्ही लोकांत आहे, तो सदैव आपल्या सोबत आहे.
अशाप्रकारे समर्थ आपल्या मनाला त्या प्रभूची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत.
||जय जय रघुवीर समर्थ ||
Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )27, 28, 29
Comments
Post a Comment