Manache Shlok, Manache Shlok With Meaning, मनाचे श्लोक व अर्थ (Spirituality, Adhyatm Ani Apan, Adhyatm) 6, 7
Manache Shlok, Manache Shlok With Meaning, मनाचे श्लोक व अर्थ (Spirituality, Adhyatm Ani Apan, Adhyatm)
||श्री||वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला असे मानले जाते.
नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत.रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले.
Manache Shlok, Manache Shlok With Meaning, मनाचे श्लोक व अर्थ (Spirituality, Adhyatm Ani Apan, Adhyatm)
||नको रे मना क्रोध हा खेदकारी
नको रे मना काम नाना विकारी
नको रे मना लोभ हेय अंगिकारू
नको रे मना मस्त्रॊ दंभ भारू||
अर्थसमर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या रागाचे, मत्सराचे आणि वासनेचे विवरण देत आहेत. समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेल्या दासबोध या ग्रंथामध्ये पहिल्या दशकात "स्तवन नाम "पहिल्या समासात "मंगलाचरण " यामध्ये सांगतात कि -"अभिमानें उठे मत्सर |मत्सरे ये तिरस्कार |पुढे क्रोधाचा विकार प्रबळी बळे ||ऐसा अंतरी नासाला |कामक्रोधें खवळला अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसें ||कामक्रोधें लिथाडीला तो कैसा म्हणावा भला |अमृत सेविताच पावला मृत्य राहो ||"
समर्थ म्हणतात कि कोणत्याही विषयांचा अतिप्रमाणात वापर हा वाईट असतो. म्हणून विवेकाचा उपयोग करून विषयांचा वापर योग्य केला तरच संसार उत्तमाचा होऊ शकतो. एखाद्या गोष्टीबद्दल अभिमान बाळगू नये जर अभिमान जवळ ठेवला तर मत्सर सुद्धा मनामध्ये घर करतो, मत्सरामुळे तिरस्कार येतो, आणि शेवटी क्रोध जन्माला येतो. या सर्व विषयांमुळे मनुष्य अंतःकरनातून नासून जातो. असा व्यक्ती समाजात योग्य व उत्तमाचा व्यवहार व आचरण करू शकत नाही.
म्हणून समर्थ स्वारी या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या मनाला समजावतात कि हे मना अभिमानच विष घेऊ नको, मत्सराला जवळ करू नको, क्रोधाला बळी पडू नको.
Manache Shlok, Manache Shlok With Meaning, मनाचे श्लोक व अर्थ (Spirituality, Adhyatm Ani Apan, Adhyatm)
||मना श्रेष्ठ धारिष्ट जीवि धरावे
मना बोलणे नीच सोशीत जावे
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे
मना सर्व लोकांसि रे नीववावे||
अर्थसमर्थ रामदास आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये धैर्य, सहनशीलतेची, नम्रतेची ओळख करून देतात. या सृष्टीमध्ये आपण जसे वर्तन करतो तसेच आपल्याला त्याचे प्रतिउत्तर मिळत असते. जसे व ज्याचे बीज पेरले जाते त्याचेच रोप उगवते, म्हणून जसे आपण कर्म करू तसेच आपल्याला फळ मिळते. विज्ञानाने सुद्धा हे मान्य केले आहे (Law Of Attraction-Every action there is equal and apposite reaction.)
सहनशीलता आणि धैर्य अंतःकरणामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मन चंचल न राहता शांत राहते, मनाची व बुद्धीची वैचारिक पातळी वाढते आणि बुध्दीमधे विवेक जागृत होतो व उत्तम कार्यभाग होतो परिणामी त्याचे फळदेखील उत्तम प्राप्त होते.
म्हणून समर्थ सांगतात कि समाजामध्ये कितीही निंदा झाली तरी ती आत्मसात करावी व क्रोध न करता नम्रतेची भावना ठेऊन समोरच्या लोकांना समजून घ्यावे आणि परिस्तिथिनुसार विवेकबुद्धीने धैर्य ठेऊन पाऊल उचलावे.
Manache Shlok, Manache Shlok With Meaning, मनाचे श्लोक व अर्थ (Spirituality, Adhyatm Ani Apan, Adhyatm)
||जय जय रघुवीर समर्थ ||
Comments
Post a Comment