Manache Shlok With meaning(मनाचे श्लोक व अर्थ ) 16, 17

Manache Shlok With meaning(मनाचे श्लोक व अर्थ ) 16, 17
||श्री ||
छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास यांचे शिष्य होते. स्वराज्य रक्षणासाठी रामदासांनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १५ सप्टेंबर १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिली होती. याबाबतचे एक पत्र इ. स. १९०६ मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवांनी ‘समर्थांची दोन जुनी चरित्रे’ या ग्रंथात प्रकाशित केले होते; पण या वेळेस देवांना या पत्राची मूळ प्रत न मिळता एक नक्कल सापडली होती.

यानंतर इतिहासाचार्य राजवाड्यांनाही या पत्राच्या काही नकला सापडल्या. शिवाय, अनेक नकला पुणे पुराभिलेखागारात इनाम कमिशनच्या दफ्तरातही सापडतात; पण या सगळ्या नकला अथवा मूळ पत्राच्या कॉपी असून मूळ पत्र हे अनेक वर्षे कोणाच्याही पाहण्यास आले नव्हते. अखेरीस मे २०१७ मध्ये लंडनच्या ‘ब्रिटिश लायब्ररी’त या मूळ पत्राची फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनवलेली एक प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना सापडली असून, महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे आहेत, त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. सदर सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे आहेत. पत्राच्या मुख्य बाजूवरचे अक्षर आवजी चिटणिसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते आहे.

‘श्रीसद्‌गुरुवर्य, श्रीसकळतीर्थरूप, श्रीकैवल्यधाम, श्रीमहाराज श्रीस्वामी, स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापनाजे’’, अशा मायन्याने हे पत्र सुरू होते. त्यापुढे शिवाजी महाराजांनी स्वत:च्या शब्दात पूर्वी समर्थांनी त्यांना काय उपदेश केला, त्याबद्दल थोडक्‍यात लिहिले आहे.
Manache Shlok With meaning(मनाचे श्लोक व अर्थ ) 16, 17
||मनीं मानवी व्यर्थ चिंता वहातें
अकस्मात होणार होऊन जातें
घडे भोगणे सर्वही कर्मयोगें
मतीमंद तें खेद मानी वियोगें||
अर्थ
या मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात कि मनुष्य या संसारामध्ये सर्व गोष्टींची चिंता करीत बसतो, हे काम पूर्ण होईल का? ते मला मिळेल का? असं झालं तर काय करायचं? अशा कितीतरी गोष्टी, चिंता त्याला भेडसावत असतात, समर्थ म्हणतात कि मनुष्य भविष्याची चिंता करत बसतो नि वर्तमानातील कालावधी व्यर्थ घालवतो. जे घडायचं आहे ते घडणारच आपण व्यर्थ चिंता करत बसू नये. भविष्याची चिंता करण्यापेक्षा आली घडी सार्थकास नेण्यास उत्तमता आहे, याचा जर विवेकबुद्धीने विचार केला तर आयुष्य सुखकर होऊन जाईल. जे नशिबात असते तेच घडते आणि नशीब हे आपल्या कर्मवरती अवलंबून आहे म्हणून भविष्याची चिंता न करता उत्तम कर्म करावे.
Manache Shlok With meaning(मनाचे श्लोक व अर्थ ) 16, 17
||मना राघवेंवीण आशा नको रे
मना मानवाची नको कीर्ति तूं रे
जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे||
अर्थ
समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या या विकारी आणि विषयांनी ग्रासलेल्या मनाला समर्थ रामदास स्वामी समजावून सांगतात कि हे मना तू श्री प्रभू रामचंद्रांच्या भक्तीची, त्यांच्या चरणाची, त्यांच्या उपासनेची, त्यांच्या शिकवणीची आशा धर, ज्या प्रभूला सर्व वेद, उपनिषद, वंदन करतात, पूर्ण ब्रह्मांड जो चालवितो असा प्रभू श्री रामाची ओढ असू दे. हा सगळा संसार आणि प्रपंच सर्व काही त्यातील विषय विकार त्याच्या चरणाशी अर्पण करून, त्याच प्रभूची आज्ञा समजून कर्तव्य आणि कर्माचे पालन करीत राहा.असे समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये सांगतात.
||जय जय रघुवीर समर्थ||




Comments

Popular posts from this blog

मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan ) 2, 3

Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )21, 22, 23

स्वगुन परीक्षा 4-पंचमहाभूते (Swagun Pariksha 4-5 elements)