Manache Shlok, Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ, Spirituality, Adhyatm Ani Apan) 12, 13
Manache Shlok, Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ, Spirituality, Adhyatm Ani Apan)
||श्री ||समर्थांनी ११ मारुतींची स्थापना केली. गावोगाव मारुतीची देवळे बांधली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची देवळे याच परिसरात आहेत. ती पुढीलप्रमाणे:
(१) दास मारुती, चाफळ (राम मंदिरासमोर)
(२) वीर मारुती, चाफळ (राम मंदिरामागे)
(३) खडीचा मारुती, शिंगणवाडी, चाफळ (डोंगरावर)
(४) प्रताप मारुती, माजगांव, चाफळ
(५) उंब्रज मारुती (ता. कराड)
(६) शहापूर मारुती (उंब्रज जवळ)
(७) मसूर मारुती (ता. कराड)
(८)बहे-बोरगांव (कृष्णामाई) मारुती (जि. सांगली)
(९) शिराळा मारुती (बत्तीस शिराळा, जि. सांगली)
(१०) मनपाडळे मारुती (जि. कोल्हापूर)
(११) पारगांव मारुती (जि.कोल्हापूर).[४] ही ती गावे होत
Manache Shlok, Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ, Spirituality, Adhyatm Ani Apan)
||मना मानसी दुख आणू नको रेअर्थ
मना सर्वथा शोक चिंता नको रे
विवेके देहे बुद्धी सोडुनी द्यावी
विदे- ही पाने मुक्ती भोगीत जावी||
समर्थ रामदास स्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये दुःख, शोक, चिंता याच विश्लेषण करतात.ज्यावेळी आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडत नाही, ज्यावेळी एखाद्या गोष्टीची प्राप्ती आपल्या मनाप्रमाणे आपल्याला होत नाही त्यावेळी आपल्याकडे राग, द्वेष, मत्सर यासारखे विषय येतात, परिणामी दुःख वाट्याला येते आणि जर एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली तर आनंद, प्रेम या भावना आपल्याकडे येतात पण तो आनंद जर प्रमाणात असेल तरच सुख प्राप्ती होते, अतिप्रमाणं झाले तर अभिमान आणि गर्व यासारखे विषय येतात. म्हणजेच काय तर, सुख आणि दुःख हे पूर्णपणे एखाद्या गोष्टीबद्दल धरलेल्या अपेक्षेवर, आशेवर अवलंबून आहे. समर्थ या श्लोकामध्ये सांगत आहेत कि ही देहबुद्धी म्हणजेच आपली या देहाबद्दल, आजूबाजूला असलेल्या नश्वर मायेबद्दल असलेली आसक्ती, अपेक्षा, ओढ ज्याचा काहीही फायदा आपल्याला नाही, ही अपेक्षा, ही आसक्ती आपल्याला सुखदुःखाच्या फेऱ्यातच अडकवणार आहे, म्हणून या देहबुद्धी आणि नश्वर मायेबद्दल कसलीही अपेक्षा न धरता जर आपण उत्तम, मंगल आचरण ठेऊन कर्म केली तर, सुख अथवा दुःख अशी परिस्तिथी येणारच नाही, परिणामी या व्यापातून मुक्ती मिळेल आणि स्वर्गीय आनंद लाभेल.
Manache Shlok, Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ, Spirituality, Adhyatm Ani Apan)
||जीवा कर्म योगे जनी जन्म झालाअर्थ
परी शेवटी काळ मुखी निमाला
महा थोर ते मृत्यू पंथेची गेले
किती एक ते जन्मले आणि मेले||
समर्थ रामदास स्वामींनी या श्लोकामध्ये मानवी जीवनाचं महत्व समजावून सांगितलं आहे. आपल्या पुराणांमध्ये लिहिलेले आहे कि या ब्रह्मांडामध्ये चौर्यांशी लक्ष जीव योनी आहे, त्र्याऐंशी लक्ष नऊव्यान्नवहजार नवशे नव्यान्नव जीव योनिनंतर, मानवी जन्म प्राप्त होतो. फक्त याच जन्मामध्ये हा प्राणी आपल्या इंद्रियांचा वापर करून कर्म करू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो, बोलू शकतो, पाहू शकतो, इत्यादी. विवेकाने विचार केला तर समजेल कि फक्त मानवप्राणीच उत्तम भक्ती करू शकतो या इंद्रियांचा वापर उत्तम कार्य करण्यासाठी करू शकतो, हात जोडून वंदन करू शकतो, डोळ्यांनी उत्तम पाहू शकतो ग्रंथ वाचू शकतो, उत्तम काव्य लिहू शकतो, वाचेने उत्तम बोलू शकतो.असा हा मानवी जन्म कार्यकारण आपल्याला लाभलेला आहे, म्हणून मानवी जन्मात येऊन आज्ञेप्रमाणे उत्तम कर्म करून, भक्ती करून मोक्ष मिळवून या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पाडण्यासाठी हा मानवी जन्म प्राप्त झाला आहे असे समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात.
कितीतरी लोक या पृथ्वीवरती जन्माला येतात, लहान मोठे, श्रीमंत गरीब, इत्यादी पण शेवटी मृत्यू हा अटळ आहे, तो प्रत्येकाला येतच असतो, या जन्म आणि मृत्यूमधील अंतर म्हणजेच जिवन जे मोक्षप्राप्तीसाठी उत्तम कर्माने पार पडायला हवे असे समर्थ रामदास स्वामी सांगतात.
||जय जय रघुवीर समर्थ ||
Manache Shlok, Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ, Spirituality, Adhyatm Ani Apan)
Comments
Post a Comment