Manache Shlok With Meaning (मनाचे श्लोक व अर्थ )18, 19, 20
Manache Shlok With Meaning (मनाचे श्लोक व अर्थ )18, 19,
20
||श्री ||रामदासस्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. त्यांच्या तत्त्वज्ञानास संत एकनाथांच्या वाङ्मयाची बैठक होती. दासबोधाच्या बहुतेक सर्व दशकांमध्ये ब्रह्म, माया, जीव, जगत्, परमेश्वर इत्यादी गोष्टींची चर्चा आहे. पंचीकरण हा विषय समर्थांनी अतिशय सखोलपणे सांगितला आहे. परब्रह्म, मूळमाया, गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड-ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध अशा अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात आहे. सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून, आपण मिथ्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्तेपण घेतो असे ते सांगतात. समर्थ रामदास स्वामी स्वतः सदैव विदेही अवस्थेमध्ये असल्याने त्यांचे हे अनुभवज्ञान त्यांनी ग्रंथरूपाने मांडले.
त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असे त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. त्यांनी स्वतः १२ वर्षे नामस्मरण भक्ती केली व त्याचा प्रसार केला. परमार्थाशिवाय केलेला प्रपंच 'भिकारी' आहे. ज्या घरामध्ये रामनाम नाही ते घर सोडून खुशाल अरण्यात निघून जावे असे समर्थ निक्षून सांगतात. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे असे त्यांचे मत होते. समर्थांनी प्रत्ययाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानले. अनुभवाशिवाय असलेल्या केवळ शब्दज्ञानाची त्यांनी तिखट शब्दात हजेरी घेतली आहे. भोंदू गुरू व बावळट शिष्य हे परस्परांचे नुकसान करतात असे त्यांनी सांगितले आहे
Manache Shlok With Meaning (मनाचे श्लोक व अर्थ )18, 19, 20
||मना सर्वथा सत्य सांडूं नको रे
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे
मना सत्य ते सत्य वाचे वदावें
मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावें||
अर्थसमर्थ रामदास स्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये सत्य आणि मिथ्य यातला फरक ओळखण्यास सांगतात. समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला सांगतात कि हे मना तू सत्य काय आहे ते जाणून घे, सत्याची ओळख करून घे आणि सत्याची बाजू धरून ठेव. या संसार मायेच्या भावसागरामध्ये गुरफटून जाऊ नकोस आपली जीवनाची नौका पैलतीरावर नेण्यासाठी सत्याची ओळख करून घेणे अतिमहत्त्वाचे आहे. मग सत्य हे काय आहे, आपले शरीर?, सभोवतालच्या या सगळ्या दिसणाऱ्या वस्तू? असणारी परिस्तिथी? घडणाऱ्या गोष्टी? भावना आणि त्यातले विषय विकार? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत? त्यापासून बनलेली ही सृष्टी?
जे नष्ट होणार आहे, नाश पावणार आहे ते सर्व खोटं म्हणजेच मिथ्य आहे आपले शरीर हे नाक, कान, डोळे, हे सर्व अवयव, आपल्या सभोवताली दिसणाऱ्या या सर्व गोष्टी -गाडी, बंगला, पैसा इत्यादी.प्रारब्धामुळे येणारी परिस्तिथी ही तशीच राहत नाही ती सुद्धा बदलते, एवढंच काय ही सृष्टीसुद्धा एक मिथ्यच आहे (समर्थानी दासबॊधामधील -दशक सहावा "देवशोधन" मधील समास सहावा "सृष्टिकथान नाम "मध्ये सविस्तर सांगितले आहे. )या सृष्टीमध्ये असणारी ही पंचमहाभूत सुद्धा (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश )मिथ्यच आहे. ज्यावेळी ही सृष्टीच अस्तित्वात नव्हती त्यावेळी फक्त एक च शक्ती ज्यानं हे संपूर्ण ब्रह्मांड नि सर्वकाही निर्माण केल असा तो निर्गुण निराकार कर्ता करविता परमेश्वर अस्तित्वात होता नि अजूनही ही सर्व सृष्टी सामावून बसलेला आहे असा तो एकच सत्य आहे.
समर्थ म्हणतात कि जो सत्य आहे त्यालाच धर- परमेश्वराचा भक्तिमार्ग धर, जे मिथ्य आहे ते सोडून दे-विषय विकारांचा त्याग कर,जे सत्य आहे त्याचाच वाचन कर -गीता, उपनिषद, ग्रंथ ज्यातून उत्तम जीवनाची शिकवण मिळते तेच वाच, जे सत्य आहे त्याचाच गायन कर -फक्त त्या परमेश्वराचेच भजन कर.
असे समर्थ आपल्याला सांसारिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही मार्गानी फक्त सत्याचीच बाजू धरावयास सांगत आहेत.
Manache Shlok With Meaning (मनाचे श्लोक व अर्थ )18, 19, 20
||बहू हिंपुटी होईजे मायपोटीं
नको रे मना यातना तेचि मोठी
निरोधें पचे कोंडिलें गर्भवासीं
अधोमूख रे दुःख त्या बाळकासी||
||मना वासना चूकवी येरझारा
मना कामना सोडि रे द्रव्यदारा
मना यातना थोर हे गर्भवासी
मना सज्जना भेटवी राघवासी||
अर्थसमर्थ रामदास स्वामी या मनाच्या श्लोकामध्ये विवेकाने सांगत आहेत कि, आईच्या पोटामध्ये असताना किती थोर नि वाईट यातना आणि दुःख होत होते, स्त्रीचे प्रत्येक महिन्याला अशुद्ध रक्त बाहेर पडत असते या रक्तालाच आपण विटाळ म्हणतो, गर्भवती स्त्रीच्या पोटामध्ये असा नऊ महिन्यांचा विटाळ अळून त्याचा गाळ होतो नि त्या गाळाचेच हे बाळाचे शरीर बनलेले असते. पोटामध्ये ते बाळ जणू नार्कातील तुरुंगवास भोगत असते (अंतरी म्हणे सोहं सोहं बाहेरी येता म्हणे कोहं ) गर्भात असताना खूप यातना होत असतात या नरकातून बाहेर निघण्यासाठी त्या परमेश्वराजवळ निवेदन असते कि मला या नारकवासनेतून बाहेर काढ मी बाहेर आल्यावरती तुज्याच आज्ञेत राहीन, निवेदन पास होऊन बाहेर आल्यावर मात्र त्याचे विस्मरण होते. आणि पुन्हा वाईट मार्गाचा अवलंब करतो. मग बाहेर हे संसारातले विषय विकार उत्तमाचा प्रपंच होऊन देत नाहीत आणि परमार्थापासून दूर करतात परिणामी पापाची भर पडते आणि पूर्वसंचित जसे असेल तसा पुन्हा जन्म मिळतो आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात जीव अडकून पडतो. पुन्हा त्याच गर्भ नरक यातना सहन कराव्या लागतात.
म्हणून समर्थ या दोन्ही श्लोकांमध्ये निवेदन ठेवतात कि हे प्रभू रामचंद्रा या तुज्या दासाला तुजा आज्ञेत ठेव, तुजा चरणाशी ठेव, नि विषयविकारांपासून अलिप्त करून या देहाकडून अखंड मंगलाचरण घडू दे नि या जन्म मृत्यूच्या भवसागरातून बाहेर काढून मोक्ष मिळवून दे.
||जय जय रघुवीर समर्थ ||
Manache Shlok With Meaning (मनाचे श्लोक व अर्थ )18, 19, 20
Comments
Post a Comment