Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )21, 22, 23
Manache Shlok
With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )21, 22, 23
||श्री ||केल्याने होत आहे रे ।
आज आपल्या जीवनात अपयश आणि दु:ख दिसत असेल, तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख, आंनद, यश, कीर्ती, ऐश्वर्य, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत. परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे. आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी बारा वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत. या सतत केलेल्या प्रयत्नांनाच ‘तप’ असे म्हटले जाते. आपला प्राचीन इतिहास वाचला म्हणजे खर्या धैर्याची कल्पना येऊ शकेल. जगातील सर्व देशात आणि सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही. म्हणूनच परिस्थितीवर मात करुन ते यशस्वी झाले. अंत:करणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत, अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंत:करणात धैर्य उत्पन्न होईल. साडेतीनशे वर्षापूर्वी, राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती, तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना सांगितले -
धिर्धरा धिर्धरा तकवा । हडबडूं गडबडूं नका ।केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ॥
Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )21, 22, 23
मना सज्जना हीत माझे करावे |
रघूनायका दृढ चित्ती धरावे ||
महाराज तो स्वामि वायुसुताचा |
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ||
अर्थसमर्थ रामदासस्वामी आपल्या मनाला उपदेश करत आहेत, कि हे मना तू असं काहीतरी कर कि ज्याने माझे कल्याण होईल, हित होईल.वाईट वागणूक आणि दुराचार, व्यभिचार आणि विषयवासनेची आसक्ती धरून नरक यातनाच भोगाव्या लागतील.
म्हणून असे वाईट कर्म करण्यापेक्षा तू प्रभू रामचंद्रांनी सांगितलेल्या भक्तिमार्गावरती जा. प्रभू रामचंद्र जे तिन्ही जगाचे स्वामी, श्री हनुमंतरायांचे गुरु आहेत, जे सर्व भक्तांना तारतात, जे या सृष्टीचे कर्तेकरविते आहेत अशा प्रभू रामचंद्रांना आपल्या जवळ एकाग्रतेने धर.
म्हणजेच समर्थ आपल्या मनाला सांगत आहेत प्रभू रामचंद्रांनी सांगितलेल्या भक्तिमार्गावरती वाटचाल कर, मंगल आचरण ठेव, विवेकबुद्धीने चांगले आणि वाईट याची पारख ठेऊन या संसार सागरमधून धैर्याने प्रवास कर, त्या प्रभूची उत्तम उपासना कर त्यातच आपले हित आहे.
Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )21, 22, 23
न बोले मना राघवेवीण काही
मनी वाउगे बोलता सौख्य नाही
घडीने घडी काळ आयुष्य नेतो
देहांती तुला कोण सोडू पहातो||
अर्थया मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदासस्वामी आपल्या मनाला समजावून सांगतात कि हे मना तुज्याजवळ चार वाणींपैकी एक वाणी आहे (पश्यन्ति )ती तू उत्तमाची ठेव. या चार वाणी कोणत्या?
पहिली परा जी नाभिमध्ये वास करते, दुसरी आहे पश्यन्ति जी हृदयामध्ये वास करते नि तिसरी मध्यमा जी कंठामध्ये असते आणि चौथी वैखरी जीभ मुखामध्ये वास करते.
समर्थ आपल्या मनाला समजावून सांगत आहेत कि तू उत्तम विचार केलास तर परा सुद्धा उत्तमच राहील. म्हणून तू नेहमी खरेच बोल, विवेकबुद्धीने नेहमी सत्य बोलावे कठीण परिस्तितीमध्ये सुद्धा चातुर्य वापरून सत्य बोलावे पण खोटे बोलू नये.
यावरून एक कथा आठवते, एकदा एका देऊळामध्ये तुकाराम महाराजांचे कीर्तन चालू असते, सर्वजण कीर्तनामध्ये मग्न असतात. त्यावेळेस त्या देऊळासमोरून एक शेळी पळत जाते. तुकाराम महाराजांनी ते पाहिलेलं असते, तेवढ्यात तिथे एक कसाई हातामध्ये हत्यार घेऊन त्या शेळीला शोधत त्या देवळासमोर येऊन पोहोचतो आणि महाराजांना विचारतो कि माझ्या शेळीला पाहिलंत का? महाराज त्यावेळी कोड्यात पडतात 'खरं सांगितलं तर त्या शेळीचा जीव जाईल, आणि खोटं तर बोलणार कसे? ' त्यावेळी तुकाराम महाराज चातुर्याने उत्तर देतात कि, 'ज्यांनी पाहिलं त्यांना बोलता येत नाही (डोळे ), आणि ज्यांना बोलता येत त्यांना पाहता येत नाही (वैखरी )' हे ऐकून तो कसाई वैतागून महाराजांना वेडा समजून निघून जातो.महाराजांना समाधान वाटते कारण खोटं बोलण्याचे पाप पण लागत नाही आणि शेळीचा जीव पण वाचतो.
तात्पर्य :खोटे बोलू नये, प्रसंगी विवेक आणि चातुर्य वापरावे.
समर्थ पण आपल्या मनाला हेच समजावून सांगत आहे कि, प्रत्येक क्षणाला काळ आपले प्राण घेण्यासाठी टपला आहे, शेवटी मृत्यूच्या वेळी आपल्याला काळापासून कोणीही वाचवू शकत नाही, म्हणून जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सत्य च बोल, त्या प्रभूचे नामस्मरण कर, वाउगे बोलून काहीही फायदा नाही.
Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )21, 22, 23
रघूनायकावीण वाया शिणावेअर्थ
जनासारिखे व्यर्थ का वोसणावे
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे
अहंता मनी पापिणी ते नसो दे||
समर्थ रामदास स्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये समजावून सांगतात कि, भक्तीविना जगणे व्यर्थ आहे. आपण जन्मास आल्यानंतर एक गुरु करून त्याची भक्ती करायला हवी. प्रभू रामचंद्रांच्या भक्तीमध्ये सर्व सुखाची प्राप्ती आहे, त्यांच्या उत्तम शिकवणीच्या मार्गावरूनच चालायला हवे नाहीतर मोक्षाची प्राप्ती होणार नाही.
आजकालचे हे जन दुराचारी आणि मतलबी आहे आणि हे सर्व धर्माविरुद्ध आणि शकवणीविरुद्धच आचरण आहे, असे जर आचरण असले तर हे जगणं व्यर्थ आणि पशुसमान आहे.
म्हणून अखंड, सतत त्या प्रभूचे स्मरण ठेऊन, मनामध्ये पापाला जागा न देता त्या नियंत्याचे नाम जपत राहावे.तरच मनातील भावार्थ उत्तमाचा होऊन, मनाकडे कोणत्याही परिस्तितीत अस्थिरता न येता मन स्थिर राहील आणि इंद्रियांकडून उत्तम कर्म घडतील परिणामी शेवटी मोक्ष मिळेल.
||जय जय रघुवीर समर्थ ||
Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )21, 22, 23
Comments
Post a Comment