Manache Shlok, Manache Shlok With Meaning, Spirituality(मनाचे श्लोक व अर्थ, adhyatm ani apan) 10, 11
Manache Shlok With Meaning, Spirituality(मनाचे श्लोक व अर्थ, adhyatm ani apan)
||श्री ||समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला. ‘
श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. हरगोविंदसिंगांबरोबर १००० सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले - " आपण धर्मगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता ?" तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले - " एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी". समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले - "आणि हा सारा फौजफाटा ?" त्यावर हरगोविंद म्हणाले - " धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे , केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे.'समान-शीले-व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने दोघांत सख्य झाले. समर्थ गुरु हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले. तिथे ते दोन महिने राहिले.तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले.... त्याला ते गुप्ती म्हणत. बाहेरून दिसायला कुबडी. जप करतांना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे. कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे.समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पहायला मिळते.
Manache Shlok With Meaning, Spirituality(मनाचे श्लोक व अर्थ, adhyatm ani apan)
||सदा सर्वदा प्रीती रामी धरवी
सुखाची- स्वये सांडी जीवी करवी
देहे दुख हे सुख मानीत जावे
विवेके- सदा स्वस्वरूपी- भरावे||
अर्थसमर्थानी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये सांगितले आहे कि आपल्या परमेश्वरावर्ती, गुरुवरती प्रेम असावे.कारण तीच आपली माऊली आहे, सर्व दुःखातून, व्यापातून सोडवणारी आपल्याला समजून घेणारी माता आहे. गुरुचरणाशीच खरं सुख आहे, गुरुसेवेतच खरं वैभव आहे हे जाणून घ्यायला हवे. देह ही वरची माया आहे, जे काही भोग, व्याप, ताप असतील ते या मायेलाच मिळतात त्यात कोणत्याही प्रकारचे दुःख मानू नये, आपल्या कर्मानुसार नि पूर्वसंचितानुसार आपल्याला त्याची प्राप्ती होत असते.
म्हणून समर्थ मनाला विवेक धरून विचार करायला सांगतात कि शरीर हे मिथ्य असून आतला अंतरात्मा सत्य आहे तोच परमेश्वर असून त्याला आनंदी ठेवण्यायोग्य कर्म कर.
Manache Shlok With Meaning, Spirituality(मनाचे श्लोक व अर्थ, adhyatm ani apan)
||जनी सर्व सुखी असा कोण आहे
विचारे मना तूचि शोधूनी पाहे
मना त्वाची रे पूर्व संचित केले
तया सारिखे भोगणे प्राप्त झाले||
अर्थसमर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये सांगतात कि या संपूर्ण विश्वामध्ये असा कोणीच नाही कि ज्याला सर्वसुखाची प्राप्ती आहे. देवांना सुद्धा भोग होते. रामचंद्रांना वनवास भोगावा लागला, श्री कृष्ण स्वारींना तुरुंगात जन्म घ्यावा लागला, आईपासून दूर राहावं लागलं. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फलप्राप्ती आहे. आपले भविष्य आणि नशीब हे पूर्णपणे आपल्या कर्मवरती अवलंबून असते. आपले या जन्मातील कर्मे आपल्या पुढच्या जन्मातील नशीब लिहीत असतात. ज्याप्रमाणे आपले मागील जन्मातील कर्मे आहेत त्यांची जशी शिल्लक आहे, तशेच भोग वर्तमानात आणि भविष्यात उभे असतात म्हणून समर्थ म्हणतात कि भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानातील कर्मे उत्तम केली तर प्रारब्ध उत्तमाचे होईल.
Manache Shlok With Meaning, Spirituality(मनाचे श्लोक व अर्थ, adhyatm ani apan)
||जय जय रघुवीर समर्थ ||
Comments
Post a Comment