Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )24, 25, 26


Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )24, 25, 26
||श्री ||
रामदासस्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. त्यांच्या तत्त्वज्ञानास संत एकनाथांच्या वाङ्‌मयाची बैठक होती. दासबोधाच्या बहुतेक सर्व दशकांमध्ये ब्रह्म, माया, जीव, जगत्‌, परमेश्वर इत्यादी गोष्टींची चर्चा आहे. पंचीकरण हा विषय समर्थांनी अतिशय सखोलपणे सांगितला आहे. परब्रह्म, मूळमाया, गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड-ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध अशा अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात आहे. सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून, आपण मिथ्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्तेपण घेतो असे ते सांगतात. समर्थ रामदास स्वामी स्वतः सदैव विदेही अवस्थेमध्ये असल्याने त्यांचे हे अनुभवज्ञान त्यांनी ग्रंथरूपाने मांडले.

त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असे त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. त्यांनी स्वतः १२ वर्षे नामस्मरण भक्ती केली व त्याचा प्रसार केला. परमार्थाशिवाय केलेला प्रपंच 'भिकारी' आहे. ज्या घरामध्ये रामनाम नाही ते घर सोडून खुशाल अरण्यात निघून जावे असे समर्थ निक्षून सांगतात. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे असे त्यांचे मत होते. समर्थांनी प्रत्ययाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानले. अनुभवाशिवाय असलेल्या केवळ शब्दज्ञानाची त्यांनी तिखट शब्दात हजेरी घेतली आहे. भोंदू गुरू व बावळट शिष्य हे परस्परांचे नुकसान करतात असे त्यांनी सांगितले आहे.

Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )24, 25, 26
||मना वीट मानू नको बोलण्याचा
पुढे मागुता राम जोडेल कैचा
सुखाची घडी लोटता सूख आहे
पुढे सर्व जाईल काही न राहे||
अर्थ
समर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या या मनाला समजावून सांगतात कि हे मना कोणीही काहीही बोलले तर त्या गोष्टीचे वाईट नको वाटून घेऊस, त्याने दुःखाची प्राप्ती होते, होणाऱ्या निंदेतून प्रेरणा घे आणि जीवनाची वाटचाल उत्तमाने कर, हा सुद्धा क्षण पुढे निघून जातो, मागे काही राहत नाही प्रत्येक घडीला क्षण हा बदलत असतो प्रत्येक गोष्ट बदलत असते हा सृष्टीचा नियमच आहे, म्हणून तू मायेच्या आहारी जाऊन कुठल्याही क्षणात, प्रसंगात, गोष्टीत मग त्यात सुख असो व दुःख अडकून राहू नको त्या सर्वाना मागे सोडून पुढची वाटचाल कर त्यातच खरं सुख आहे. असे समर्थ आपल्या मनाच्या श्लोकामध्ये भूतकाळाचा विचार सोडून भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानात जगायला सांगतात.

Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )24, 25, 26
||देहेरक्षणाकारणे यत्न केला
परी शेवटी काळ घेऊन गेला
करी रे मना भक्ति या राघवाची
पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ||
अर्थ
समर्थ रामदासस्वामी या श्लोकामध्ये जीवनाचे वास्तविक दर्शन घडवीत आहेत.
आपण जन्मास येऊन काय करत आहे, फक्त कष्ट करतोय.पण ते कष्ट कशासाठी चाललेत? जगण्यासाठी चालले आहेत का? नाही. आपण या खोट्या मायारूपी संसारात अडकलो आहोत, याच संसाराची अपेक्षा धरून जगत आहोत, आपल्याला या संसाराचीच ओढ लागलेली आहे, पैसा गाडी बंगला बायका मुले या साठीच सगळे कष्ट चाललेत त्यासाठी या पंचभूतांच्या देहाचा कसाही वापर करतो आपण, पैसा पुरेसा असला तरी अजून कामवावासा वाटतो. या संसार मायेत अडकून देहप्रपंचसुद्धा उत्तम राहत नाही, मृत्यूनंतर सर्व काही इथेच राहत सोबत फक्त आपल्या कर्माची पुण्याई आणि पाप घेऊन जायचं असत म्हणून समर्थ रामदासस्वामी म्हणतात कि त्या परमेश्वराची भक्ती कर, त्याचा स्वार्थ आणि आसक्ती ठेव, त्याच्या चरणाशी एकनिष्ठ राहा तरच जन्म -मृत्यूच्या फेऱ्यातून आपोआप सुटशील.

Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )24, 25, 26
भवाच्या भये काय भीतोस लंडी
धरी रे मना धीर धाकासि सांडी
रघूनायकासारिखा स्वामि शीरी
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी||
अर्थ
समर्थ रामदास आपल्या या श्लोकामध्ये सांगत आहेत कि जो या राघवाची भक्ती करतो, उत्तम आचरण करतो, विवेक आणि वैराग्याची भूमिका ज्यांच्याकडे आहे अशा उत्तम दासाला जन्ममृत्यूच्या फेऱ्याला भिण्याचे काहीच कारण नाही, त्याने कसलीही शंका न धरता, भीती न बाळगता त्या परमेश्वराची भक्ती करावी.
कारण प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद अशा दासवरती असतो जो काळालाही हरवू शकतो.
||जय जय रघुवीर समर्थ||


Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )24, 25, 26

Comments

Popular posts from this blog

मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan ) 2, 3

Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )21, 22, 23

स्वगुन परीक्षा 4-पंचमहाभूते (Swagun Pariksha 4-5 elements)