Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ, adhyatm ani apan, spirituality) 14, 15

Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ, adhyatm ani apan, spirituality)
||श्री ||
वयाच्या ३६व्या वर्षी रामदासस्वामी महाराष्ट्रात परत आले.
भारत प्रवास करतांना शेवटी समर्थ पैठणला आले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यातच उतरले. नाथ आणि त्यांची पत्‍नी या दोघांनी देह ठेवलेला होता. नाथांची पत्‍नी समर्थांची मावशी होती. पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले.
मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्नमंडपातून पलायन केल्यावर २४ वर्षे जांबशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता. त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तेथे कळले.त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे, असे येऊन गेले. समर्थ जांबला पोहोचले, पण तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि शाम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्याया गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. २४ वर्षात दाढी, जटा वाढविल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाईदेखील दीराला ओळखू शकल्या नाहीत. अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला. २४ वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले, असे मानले जाते.
समर्थ निसर्गप्रेमी होते. नद्यांचा उगम अथवा संगम ही त्यांची आवडीची ठिकाणे होती.
Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ, adhyatm ani apan, spirituality)
||मना पाहता सत्य हे मृत्यू भूमी
जिता बोल्ती सर्व ही जीव मी मी
चिरंजीव हे सर्व ही मानिताती
अक- स्मात सांडूनिया सर्व जाती ||
समर्थ रामदासस्वामी आपल्या या मनाच्या श्लोकामध्ये आपली स्वार्थी वागणुकीबद्दल विश्लेषण करून सांगतात. या सृष्टीमध्ये परमेश्वर सोडून प्रत्येक गोष्ट जन्माला येते आणि नाश ही पावते, जन्म आणि मृत्यू हे सत्य आहे नि अटळ आहे. परंतु आपणास वाटते कि आपण कधी मरणारच नाही, जन्माला आलोय तर मृत्यू हा येणारच हे विसरून गेलेलो असतो आपण, नि या संसार प्रपंचामध्ये अडकून जातो, या संसारमायेमध्ये कर्म करत असताना फळाची अपेक्षा धरून चालतो. अपेक्षा पूर्ण जरी झाली तरी त्यातून संतुष्टी मिळत नाही आणि अपेक्षा वाढतात पुन्हा त्या पूर्ण करण्यासाठी संसारमायेत फिरत बसतो.
मी किती कमवले पुढच्याने किती कमवले, माझे घर, माझी गाडी, माझे रान, ही स्वार्थी आणि मत्सरी वृत्ती ठेऊन जगत राहतो परंतु हे सर्व नाशिवंत आहे कधी ना कधी नष्ट होणार आहे असा विवेकाने विचार करायला हवा. जन्म जसा झाला मोकळ्या हातानी तसंच मृत्यूनंतरही अवस्था असते. मृत्यूनंतर हे सर्व माझं माझं झालेलं संसाराचं ओझं इथेच ठेऊन जावे लागते, सोबत असते ते फक्त कर्माप्रमाणे कमावलेली पापपुण्याची कमाई.
म्हणून जन्मी आल्यानंतर उत्तम कर्म करीत भक्तीमार्गात जिवन व्यतीत करण्यातच योग्यता आहे असे समर्थ रामदास स्वामी सांगतात.
||मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मा- त तोही पुढे जात आहे
पुरेना जाणीई लोभ रे क्षोभ त्याते
म्हणनि जणी मागुता जन्म घेते||
समर्थ रामदास स्वामी या श्लोकामध्ये लोभ आणि मत्सराची भावना व्यक्त करतात.
आपण आपल्या प्रियजनांचा मृत्यूनंतर दुःख करत बसतो, पण ज्याच्या समोर दुःख करत असतो तो एक पंचमहाभूतांचा निर्जीव पुतळा झालेला असतो, मागील जन्मी तो कोण असतो कोणाचा आई, बाप, बहीण, भाऊ असतो हे आपण सांगूही शकत नाही, प्रत्येकाच्या आत्म्यास ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे गती मिळत असते. नव्याचे नऊ दिवसाप्रमाणे हे दुःख असते, या जगामध्ये कोणावाचून कोणाचं काही अडत नाही, प्रत्येकजण स्वतःचा विचार करून शेवटी पुढे जात असतो नि कधी ना कधी मरण पावतोच. मग शोक का करावा? विवेकाने विचार केला तर धर्माचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो.
लोभ हा विषय खूप वाईट आहे. लोभाने जे हातात आहे ते सुद्धा निघून जाते, लोभामुळे मनुष्य जुगार, सट्टा अशा वाटमार्गाला लागून शेवटी व्यसनाच्या आहारी जातो आणि देशोधडीला लागतो. ज्या गोष्टीसाठी आपण लोभ धरतो त्यातून त्या गोष्टीबद्दल वासना जन्माला येते आणि वासनेचा गुणच आहे पुनर्जन्माचा.थोडक्यात एखाद्या गोष्टीबद्दलची अतिलोभाची भावना पुन्हा आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात ढकलते असे समर्थ या श्लोकामध्ये सांगतात.
||जय जय रघुवीर समर्थ ||
Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ, adhyatm ani apan, spirituality)




Comments

Popular posts from this blog

मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan ) 2, 3

Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )21, 22, 23

स्वगुन परीक्षा 4-पंचमहाभूते (Swagun Pariksha 4-5 elements)