Manache Shlok With Marathi Meaning(मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ)
मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ || जय जय रघुवीर समर्थ || सदा सर्वदा देव सन्नीध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ अर्थ समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये आपल्या मनाला समजावून सांगताना दिसतात. प्रभू श्रीराम हे समर्थ रामदास स्वामींचे उपास्य दैवत होते. समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला समजून सांगतात की, हे मना प्रभू श्रीराम सदैव आपल्या जवळच आहेत, ते जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र वास करतात, या सर्व स्रुष्टीमध्ये माझा परमेश्वर हा व्यापलेला आहे, सृष्टीच्या प्रत्येक कानामध्ये त्याचा वास आहे. आपल्या आतला अंतरात्मा हे त्याचंच एक रूप आहे. आपण देहबुद्धी मध्ये राहून जे काही कर्म करत असतो त्याचा तो एकमेव साक्षी आहे. हे मना या कली काळाच्या मगरमिठी मध्ये अनेक विषय समोर येतील. त्या विषयांच्या आहारी जाऊन दुष्कर्म करू नकोस. प्रभू श्रीराम या अवस्थेतील आपलं धारिष्ट पाहत आहेत. . त्यांची भक्ती केली तर सुख आणि आनंद याचाच लाभ आपल्याला होईल. तेव्हा हे मना तू त्या प्रभू श्रीरामाची म्हणजेच परमेश्वराची दृढ श्रद्धा आण...