मनाचे श्लोक (Manache Shlok, Spirituality, Adhyatm Ani Apan) 1


श्री
||जय जय रघुवीर समर्थ||
समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च . १६०८, जांब, महाराष्ट्र - १३ जानेवारी. १६८१ , सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले.ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे.
"श्री मनाचे श्लोक"

"गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥"
अर्थ

समर्थ स्वामींनी प्रथम आपल्या गणपती बाप्पाना वंदन केले आहे, जे विद्येचे दैवत आहे, सर्व गुणांचे अधिपती आहेत (रज, तम्, सत्व ), अशा श्री गणेश स्वारीना वंदन करून बुद्धिसाठी निवेदन ठेवले आहे कि हा भक्तीचा आणि कवित्वाचा कार्यभाग उत्तम करून घ्या. कुठल्याही प्रकारच्या विषयांकडे (मद, मत्सर, अहंकार, द्वेष, वासना, अभिमान)बुद्धीला न लावता फक्त ती ईश्वराच्या भक्तीत रमून जावी, यासाठी हे निवेदन श्री बाप्पाना वंदन करून त्यांच्या चरणी ठेवले आहे. यानंतर समर्थ सरस्वती देवीला वंदन करतात जी चारही वाणींची मूळ देवता आहे. (परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी अशा चार वाणी आपल्या शरीरामध्ये -नाभिमध्ये, हृदयामध्ये, कंठामध्ये आणि मुखामध्ये क्रमशः वास करतात. )
समर्थ अशाप्रकारे या श्लोकामध्ये हे सांगतात कि श्री गणेशस्वारी आणि सरस्वतीमातेला वंदन करून प्रभू रामचंद्रांच्या कधीही न संपणाऱ्या भक्तीच्या मार्गावरती वाटचाल करू.





Comments

Popular posts from this blog

मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan ) 2, 3

Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )21, 22, 23

स्वगुन परीक्षा 4-पंचमहाभूते (Swagun Pariksha 4-5 elements)