स्वगुन परीक्षा
Spirituality-स्वगुन परीक्षा 3(Swagun Pariksha 3)-संसार आणि प्रपंच
|| श्री ||
संसार सर्व दुःखाचे मूळ |प्रपंचामध्ये सुख केवळ | विवेकी परमार्थ शोध रे प्रपंचामध्ये ||
संसार म्हणजे काय? प्रपंच म्हणजे काय? या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत का? तर हो या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संसार वेगळा नि प्रपंच वेगळा. संसार म्हणजे आपली दृश्यातील नश्वर संपत्ती जसे कि बायको, मुलं, भाऊ, बहीण, गाडी, बंगला, जमीन, शेती, उद्योगधंदा ई. आपण सर्वजण या भौतिक संपत्तीतच अडकलो आहोत. त्यातच खरं जीवनाचं सुख आहे असं समजतो आणि तेच मागतो. आपण ईश्वरापुढे अशा नश्वर गोष्टींचाच हट्ट धरतो परंतु यात खरं सुख आहे का? मग खरं सुख कशामध्ये आहे? चला आता दुसरी गोष्ट बघूया, प्रपंच म्हणजे काय? खरं तर प्रपंच म्हणजे संसार नसून हा देहप्रपंच आहे ज्यामध्ये पाच कर्मेंद्रिये नि पाच ज्ञानेंद्रिये मोडतात म्हणजेच हात, पाय, कान, नाक, डोळे, ई. हा देहप्रपंच उत्तमाचा ठेऊन संसाराचा कार्यभाग पार पाडणे म्हणजेच जीवन होय. यामध्येच खऱ्या सुखाची प्राप्ती आहे. हा अनमोल (ज्याचं मोल करता येत नाही असा ) देह परब्रम्हाने आपणास दिला. परंतु आपण त्याची जाणीव ठेवलीच नाही. व्यसनामध्ये वैखरी घालविली, वासनेमध्ये दृष्टी घालविली, चाडीचुंगलीमध्ये श्रवण घालवले. ते सर्व गेल्यानंतर त्याची किंमत दवाखान्यामध्ये समजली. आपण जर आपला देहप्रपंच उत्तम केला तर आपल्या अंतरातील अंतरात्मा (परमात्मा ) खुश नाही का होणार.
हिन्दीमे अनुवाद
Spirituality-स्वगुन परीक्षा 3(Swagun Pariksha 3)-संसार आणि प्रपंच
संसार क्या हैं? प्रपंच किसे केहते हैं? संसार का मतलब अपनी भौतिक नश्वर संपत्ती जो कुछ समय बाद नष्ट हो जायेगी जैसे गाडी, घर, पत्नी, बच्चे, भाई, बहन ई. और हम इन सब चिजों का ही स्वार्थ कर रहे हैं. इन सब चिजों मे ही सुख देखते हैं और जीवन जी लेते हैं. क्या इसमे असली सुख हैं? दुसरी तरफ अगर हम प्रपंच कि बात करें तो प्रपंच मतलब हमारा शरीर जो पांच कर्मेंद्रियो और पांच ज्ञानेद्रियोंसे बना हुआ हैं, जो अनमोल हैं, जिसका कोई मोल नही लेकिन क्या हमने इस्का सही मोल जान लिया हैं? नही यदी जान लिया होता तो हमने इस शरीर का दुरुपयोग नशा करणे मे और धोका देणे मे, दुष्कर्म करणे मे नही किया होता.
इस शरीर प्रपंच का उत्तम उपयोग करके संसार का कार्य करणे मे ही असली सुख हैं.
In English
Spirituality-स्वगुन परीक्षा 3(Swagun Pariksha 3)-संसार आणि प्रपंच
What is the world? What is fraud? Are these two different concepts? So yes these are two different things. The world is different and phenomenally different. The world is the property of your view, such as wife, children, brother, sister, car, bungalow, land, farming, etc. We are all trapped in this material wealth. They think that there is happiness in real life and they ask for it. We long for such mortal things before God, but is there real happiness? Then what is true happiness? Now let's look at another thing, what is treason? In fact, phenomena is not a world but it is a physical phenomenon in which the five senses and five senses are broken, ie, hands, feet, ears, nose, eyes, e. It is life, which is the fulfillment of this body in the life of the self. In this is the real happiness. This precious (unbearable) body was given to you by Parabrahma. But you are not aware of it. Addicted to addiction, lost sight in lust, auditioned in Chadchungli. After they were all gone, the price was realized in the hospital. If we make our body better, why will our inner conscience not be happy?
Comments
Post a Comment