मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan ) 2, 3
||श्री|| ||जय जय रघुवीर समर्थ|| मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan ) समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर असे होते. ते ऋग्वेदी असून जमदग्नी हे त्यांचे गोत्र होते. ते सूर्योपासक होते. त्यांच्या पत्नीचे, म्हणजे गंगाधर-नारायणांच्या आईचे नाव 'राणूबाई ' होते. मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan ) श्री मनाचे श्लोक (manache shlok) "मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥" अर्थ समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला समजावत आहेत. जशी एखादी आई आपल्या लहान बाळाला समजावते अगदी तसंच, समर्थ म्हणतात कि हे मना, हे सज्जन मना भक्तीच्या मार्गावरती चल. आपल मन हे चंचल असत, ते कधी एका गोष्टीत तर कधी दुसऱ्या गोष्टीत गुंतलेलं असत. अशा मनाला नियंत्रणात आणायचं काम आपल आहे, जशी एखादी आई आपल्या मुलाला सांभाळते, त्याला वाईट गोष्टीपासून दूर करते आणि चांगल्या उत्तमाच्या गोष्टी शिकवते.अशा चंचल मनाला स...