स्वगुण परीक्षा 5-जडत्व (Swagun Pariksha 5)
श्री देह जडत्वास जाण्यापूर्वी | निवेदावे श्रीसद्गुरुचरणी | कृपा व्हावी तुझी उपरी | अखंड नामात निद्रा व्हावी || स्वगुण परीक्षा 5-जडत्व (Swagun Pariksha 5) आपला देह हा स्थूल आहे. आपली पंचतत्त्व दिवसभर कार्यरत असतात. आपण जी कर्म करतो त्यासाठी या देहाचा वापर करतो. अंतरात्मा स्थूल देहाचा वापर करून आपली दैनंदिन कार्य पार पाडत असतो. मग हा स्थूल देह पाच कर्मेंद्रिये आणि पाच ज्ञानेंद्रिये याचा योग्य किंव्हा अयोग्य रीतीने वापर करून पाप किंव्हा पुण्य कर्म करीत राहतो. आपण दिवसभर नामस्मरण किती करतो आपल्या अंतरातील परमेश्वराला सुखाची प्राप्ती होण्यायोग्य आपले कर्म घडते का? निश्चितच संभाव्यता कमीच असते.आपले शरीर आणि मन आरोग्यसंपन्न ठेवणे हा मनुष्याचा धर्म आहे, आणि हे तेंव्हाच घडते जेंव्हा आपण मनाच्या विषयविकारांमध्ये न अडकता आत्मस्थितीत राहून ऊत्तम कर्म करतो. दिवसभर विषयांचे ओझे वाहिल्यामुळे, अधार्मिक कार्यामध्ये, सांसारिक वा प्रापंचिक कार्यामध्ये जेवढा जास्त देहाचा वापर केला जातो तेवढे जडत्व या देहाकडे येऊन देहाची कार्यक्षमता कमी होते. विषयांमुळे स्थूलदेहाला जडत्व येऊन जिवाची चैतन्य ग्रहण करण्याची क...