Posts

Showing posts from October, 2019

स्वगुन परीक्षा 1(Adhyatm, Adhyatm Ani Apan, Spirituality)

Image
||श्री|| स्वगुन परीक्षा 1(Adhyatm, Adhyatm Ani Apan, Spirituality) देह जड झाला निशी | निद्रा आली उंबरठ्यापाशी |आदरातिथ्य करण्यापूर्वी परीक्षावे स्वगुन दिवसभराचे || देह आणि आत्मा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. देह म्हणजेच माया (ती ) आणि देहामधील आत्मा म्हणजेच पुरुष (तो ). या दोघांचे जेंव्हा मिलन होते तेंव्हाच प्रकृतीचा म्हणजेच वास्तविक सजीव घटकाचा जन्म होतो. हेच खरे सत्य आहे. आता रात्रीची वेळ आहे. या देहरूपी मायेला दिवसभराच्या क्रियाकर्मामुळे थकवा (जडत्व )जाणवत आहे. निद्रेचा प्रवेश या मायेत येण्यापूर्वी दिवसभरातील क्रियाकर्मे आपण कोणत्या गुणांन मधून केली, आपल्या अंतरात्म्याला आपण सुखाची प्राप्ती दिली कि दुःखाची याचे स्मरण करणे आवश्यक आहे. तरच आत्मज्ञानामध्ये वृद्धी होऊन मोक्षाकडे जाणारा मार्ग दिसण्यास मदत होऊ शकते. स्वगुन परीक्षा 1(Adhyatm, Adhyatm Ani Apan, Spirituality) हिंदी मे अनुवाद शरीर और आत्मा दोनो अलग अलग हैं ना कि एक. शरीर ही माया हैं (स्त्री ) और आत्मा ही पुरुष हैं.इन दोनो का जब मेल होता हैं तभी प्रकृती का जन्म होता हैं और यही सत्य हैं. अब संध्या का समय हैं पुरा शरी...

स्वगुन परीक्षा (Adhyatm, Adhyatm Ani Apan, Spirituality)

Image
स्वगुनपरीक्षा ||श्री|| स्वगुन परीक्षा (Adhyatm, Adhyatm Ani Apan, Spirituality) हे गणेशा सद्गुरुराया||द्यावी आज्ञा ऐसी मज, कराया स्वगुणाचे लिखाण ||स्मरून, वंदून तुझिया चरणां, मार्ग क्रमितसे तत्परिसे || स्वगुन म्हंणजे स्वतःचे गुण जे आपण आपल्या जीवनामध्ये, नित्यकर्मामध्ये, प्रपंचामध्ये, संसारामध्ये याचा नेहमी अवलंब करीत असतो. गुणांचे प्रमुख तीन प्रकार पडतात. सत्व, रज आणि तम्. सत्वगुण ज्या गुणांचा संतपरंपरेने अवलंब केला, ज्यामध्ये धर्म आणि करुणा स्पष्ट दिसून येते असा गुण आणि रजोगुण ज्या गुणांमध्ये आपण सर्वजण आहोत असा, यामध्ये मनुष्य अस्थिर परिस्थितीत असतो. धर्म ज्ञानाची प्राप्ती असूनसुद्धा अधर्माप्रमाणे आचरण करतो. पक्का पढतमूर्ख असतो. तामस म्हणजे तामसी वृत्ती असणारा तापट, अधर्मी, विषयांचा अतिप्रमाणात वापर करणारा असा. हे विषय म्हणजे मद, मत्सर, संशय, चिंता, लोभ, संशय, अभिमान, तिरस्कार इत्यादी. आता आपण सर्वजण आपल्या श्री गणेशाचं स्तवन करून त्यांची आज्ञा घेऊन, त्यांना वंदून आपल्या गुणांचा अभ्यास करून त्यांना सात्विकतेची जोड मिळावी यासाठी प्रार्थना करू. स्वगुन परीक्षा (Adhyatm,...